डोळा हा अगदी लहानसा अवयव असला, तरी शरीरातील इतर अवयवामध्ये होणारे सर्व टय़ूमर डोळ्यांत किंवा डोळ्यांजवळच्या भागात होऊ शकतात.
- डोळ्यांत किंवा त्याच्या अलीकडे होणारे टय़ूमरचे प्रमाण इतर टय़ूमरच्या तुलनेत कमी असते. अर्थात, त्यावर उपचारांनी निश्चितपणाने मात करता येते. यासाठी केलेली शस्रक्रिया किंवा अन्य उपचार हे डोळे वाचवू शकतात.
- डोळ्यांजवळ होणार्या टय़ूमरवरील उपचारांची पद्धत वेगवेगळ्या प्रकारची असते. शरीरात कुठेही टय़ूमर किंवा कर्करोग असेल, तर त्याच्यावर मुख्य ट्रिटमेंटची पद्धत पुढीलपैकी एक किंवा रूग्णाच्या गरजेप्रमाणे एकाहून अधिक अशी असते. शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि केमोथेरपी इत्यादी. तसेच डोळ्यांच्या बाबतीत उपयुक्त उपचारपद्धतीही अशा आहेत. याशिवाय लेसर, थर्मेथेरॉपी, क्रोयोथेरॉपी, फ्लाकथेरॉपी अशा नवनवीन उपचारांच्या पद्धतीने डोळ्यांचे टय़ूमर पूर्णपणे सहज बरे होतात.
- डोळ्यांच्या पापणीला, डोळ्यांच्या बाहेर, डोळ्यांच्या वरच्या बाजूस किंवा डोळ्यांच्या आत टय़ूमर होऊ शकतात. रेटिनोब्लास्टोमा हा टय़ूमर अनुवंशिक असेल, तर दोन्ही डोळ्यांस होतो. तो लवकर म्हणजे जन्मतः किंवा जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात उद्भवतो आणि जास्त प्रमाणात असतो.
- हा आजार जेनेटिक असेल, तर हा टय़ूमर एका डोळ्यांत असतो आणि दोन वर्षांच्या वयानंतर होतो. लहान मुलांच्या डोळ्यांचा फ्लॅश फोटो काढल्यावर हा दिसून येतो.
- मुलांच्या डोळ्यांत मध्यभागी पांढरा दिसला तर तातडीने सतर्क होऊन या टय़ूमरचा शोध किंवा तपासणी केले पाहिजे.
- डोळ्यांत अचानक तिरळेपणा दिसायला लागल्यास डेळ्यांत औषध घालून, भावली मोठे करून डोळ्यांची नस तपासली पाहिजे.
- टय़ुमरच्या उपचारांत लेसरपेक्षा थर्मोथेरपी हा मार्ग चांगला आहे. या पद्धीने फक्त टय़ूमरचा विनाश होतो आणि रूग्णाच्या डोळ्यांतील चांगली नस धक्का न उलागता सुरक्षित राहू शकते.
- र्हब्डोमयोसर्कोसा हा भीतीदायक आणि खूप जास्त वेगाने वाढणारा कर्करोग आहे; पण यालाही केमोथेरपीद्वारे पूर्णपणे बरे करता येते. कॅन्सर नसणार्या टय़ूमरमध्ये रक्तवाहिनीचा टय़ूमर हा सगळ्यात जास्त प्रमाणात होतो. हा टय़ूमर नैसर्गिकतः 7 वर्षांच्या वयापर्यंत पूर्णपणे विरघळुन जातो. तसेच त्यावर स्टेरॉईड्स किंवा प्रॉप्रॅनोलॉल अशा इंजेक्शनद्वारे पूर्णतः उपचार करता येतो.
- प्रौढ व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांपेक्षा पापणीचे कर्करोग जास्त प्रमाणात होतात. यात सेवेशियस कॅन्सर, बेसलसेल आणि स्कॉमस सेल कॅन्सर या प्रकारांचे प्रमाण जास्त आहे. शस्त्रक्रियाद्वारे उपचार करून आणि डोळ्यांची प्लॉस्टिक सर्जरी करूनदेखील या प्रकारच्या टय़ूमरवर उपचार करता येतात.
- मोठय़ांमध्ये अश्रुंपिंडाचे किंवा ‘लॅकरिमल ग्लान्ड’चेम टय़ूमर्ससुद्धा जास्त प्रमाणात होतात. यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या तीन उपचारांनी डोळा बरा केला जातो. – डॉ. रमेश मूर्ती