प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी व कोरोना बालरुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सोमवारी 21 जून रोजी रत्नागिरी दौऱयावर येणार होते, मात्र हा दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
हा दौरा का रद्द झाला, या बाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु मंत्री-महोदय येणार म्हणून प्रशासनाने कोरोना बालरूग्णालयाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी केली होती. मात्र त्यांचा रत्नागिरी दौराच रद्द झाल्याने आज सोमवारी हा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.