प्रतिनिधी/ वाई
नुकतीच बदली झालेले वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी वाई शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था त्यांच्या कार्यकाळात चांगलीं राबवली.त्याबद्दल भाजप वाईच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा छोटेखानी सत्कार केला.यावेळी बोलताना काशिनाथ शेलार म्हणाले, अजित टिके साहेब गेली साडे तीन वर्षे वाईमध्ये कार्यरत होते.त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण करून पोलीस आणि नागरिक यांच्यात समनव्य साधून लोकाभिमुख कारभार केला.त्याचेच उदाहरण म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणा.तसेच त्यांनी सामाजिक प्रबोधन केले.त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.