अबकारी विभागाची सत्ती येथे कारवाई, 131 किलो गांजा जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
सत्ती (ता. अथणी) येथे उसाच्या मळय़ात गांजा पिकविणाऱ्या एका शेतकऱ्याला अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या जवळून सुमार 5 लाख रुपये किंमतीचा 131 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
देवाप्पा इराप्पा रुद्रगौडर (वय 67, रा. सत्ती, ता. अथणी) असे अबकारी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या वृध्द शेतकऱयाचे नाव आहे. अबकारी विभागाचे संयुक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त के. अरुणकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
अबकारी उपअधिक्षक एल. एस. सलगरे, अथणी विभागाचे अबकारी निरीक्षक महेश धुळपण्णावर, उपनिरीक्षक बी. एस. मुडशी, एस. बी. असकी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून उसाच्या मळय़ात पिकविण्यात आलेली गांजाची 16 झाडे अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.