बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळीसाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणारे ऊस व केळीची व आंब्याच्या पानाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. शनिवारपासून नागरिक पूजेसाठी ऊस खरेदी करताना दिसून आले. शहरातील काकतीवेस, समादेवी गल्ली, खडेबाजार यासह इतर ठिकाणी विपेत्यांनी ऊसाची विक्री केली.
दिवाळीला मोठया प्रमाणात ऊसाची विक्री केली जाते. यापार्श्वभूमीवर विपेतेही अधिक प्रमाणात ऊस घेऊन शहराच्या विविध भागात दाखल झाले होते. शनिवारी संध्याकाळपासून लक्ष्मीपूजनाला सुरूवात झाली. त्यामुळे दिवसभर पूजेचे साहित्य खरेदी करताना नागरिक दिसत होते.