बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड तसेच गुन्हेगारीवर आधारित चित्रपट अत्यंत पसंत केले जातात. असाच एक चित्रपट ‘मुंबई सागा’ मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांची मुख्य भूमिका असणाऱया या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. ऍक्शन दृश्यांची रेलचेल असलेल्या या टीझरमधून चित्रपटाची कथा बऱयाचअंशी समजून येते.
चित्रपटात जॉन अब्राहम एका अंडरवर्ल्ड डॉनच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. तर इम्रान हाश्मी त्याच्या मागे लागलेल्या एका पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे.
चित्रपटात जॉन तसेच इम्रान यांच्यासह सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवालही मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. मुंबई सागाचे पटकथालेखक आणि दिग्दर्शक संजय गुप्ता आहेत. भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.