स्मार्टफोन, कॉम्प्युटर्सना मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन्स, नोटबुक आणि टॅब्लेटसारख्या उत्पादनांमध्ये ऍपल या कंपनीने आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. गेल्या तिमाहीत देशातील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत उत्पादनांच्या वाढत्या मागणीच्या माध्यमातून ऍपल कंपनीने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
आयडीसी या रिसर्च फर्मने केलेल्या पाहणीत वरील बाब स्पष्ट झाली आहे. भारतात गेल्या तिमाहीत सर्वाधिक संख्येने कॉम्प्युटरची ऍपलने निर्यात (शिपमेंट)केली आहे, असे दिसून आले आहे. भारतात जानेवारी-मार्चच्या कालावधीत कॉम्प्युटरच्या बाजारपेठेत ऍपलने 5.4 टक्के इतका वाटा मिळवत पाचवे स्थान मिळवले आहे. जहाजामार्गे कॉम्प्युटर्सची पाठवणी करण्याचे प्रमाण तिमाहीत तब्बल 336 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. ग्राहकोपयोगी एकंदर बाजारात कॉम्प्युटर्सच्या क्षेत्रात वाटा मिळवण्यात ऍपल एचपी, लेनोव्हा आणि डेलनंतर चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. एसर आणि डेलचा पुरवठा (शिपमेंट) मात्र तुलनेने कमी झाला आहे.
आयफोनसह स्मार्टफोन्सही लोकप्रिय
आयफोनमध्ये तर कंपनीने निर्विवादपणे वर्चस्व राखलेलं आहेच पण स्मार्टफोन्सच्या बाजारातही ऍपलने आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतात आयफोनच्या विक्रीत ऍपलने मोठा वाटा उचललेला आहे. ऍपलच्या आयफोन 11 व 12 चा खप भारतात सर्वाधिक राहिला असल्याची माहिती ऍपलकडून देण्यात आली आहे.