टेकनोड अहवालामधून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-चीन सीमा संघर्षाच्या प्रारंभापासून दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे चीनला कोंडीत पकडण्यासाठी भारताने चीनच्या जवळपास 59 ऍप्सवर प्रतिबंध लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चीन काही प्रमाणात सुरळीत होत सीमेवरुन माघार घेण्यावर चर्चा करण्यात आली. अशाच प्रकारे जगभरातून विविध देशांकडून चीनला केंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असून सध्या ऍपलने स्टोअरवरुन जवळपास 4500 गेम्स काढून टाकले आहेत असे सांगण्यात येते.
मागील आठवडय़ात केवळ दोन दिवसांमध्ये चायना ऍप स्टोअरवरुन 3,000 पेक्षा अधिक गेम्स काढून टाकण्यात आले आहेत. चीन सरकारकडून 1 जुलैपासून सादर करण्यात आलेल्या इंटरनेट पॉलीसीवर दबाव आल्याच्या कारणामुळे ऍपलला आपल्या चिनी ऍप स्टोअरवरुन 4,500 पेक्षा अधिक गेम्स काढून टाकावे लागल्याची माहिती टेकनोडच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.
1 जुलैपासून चीन सरकारने नवीन नियम केला आहे. सदर नियमानुसार प्रत्येक दिवसाला गेम ऍप्सना आपल्या स्टोअरवरुन हटविले आहे, अशी माहिती ऍपल चायना मार्केटींग मॅनेजर टॉड कुहन्सने दिली आहे. परंतु दुसऱया बाजूला मात्र चीन वर्षभरात जवळपास 1500 गेम्सना लायसन्सला मंजुरी देत आहे. या प्रक्रियेला साधारण सहा ते 12 महिन्याचा कालावधी लागतो.
20 हजार पेक्षा अधिक ऍप प्रभावीत
चीनच्या नवीन प्रतिबंधानुसार एकूण 20,000 पेक्षा अधिक ऍप प्रभावीत होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार या कालावधीत ऍपल चीनमध्ये जवळपास 60,000 गेम्सला होस्ट करण्याची शक्मयता आहे. यामध्ये सर्व ऍपला डाऊनलोड करुन ग्राहकांना याची खरेदी करावी लागणार आहे.