मुंबई :
उत्पादनांच्या वाढत्या मागणीची दखल घेऊन ऍमवे इंडिया व्यवसायाच्या विस्तारासाठी येणाऱया काळात 30 कोटी रुपये गुंतवणार आहे. यासाठी कंपनीने सविस्तर योजना आखली आहे. यंदा वषी कंपनीच्या उत्पादनांना घरपोच होणारी मागणी चांगलीच वाढली असल्याचे सांगण्यात येते. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीची ऑनलाइन विक्री 70 टक्के इतकी वाढल्याचे समजते. हा विक्रीचा वाढता आलेख लक्षात घेऊनच कंपनीने उत्पादनांच्या विपणन व विक्रीची पुढची योजना आखली आहे. महिन्याला पाच ते सहा लाख घरापर्यंत उत्पादनांची थेट सेवा पुरवण्याचा कंपनीचा मानस आहे. किरकोळ वस्तूंच्या मागणीला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सध्या मागणी वाढताना दिसते आहे.