प्रतिनिधी/ बेळगाव :
सरकारी कार्यालयातील निवृत्त कर्मचाऱयांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी त्यांचे निवृत्ती वेतन वेळेत मिळावे याकरिता केंद्रीय निवृत्त कर्मचारी कल्याण खात्याच्यावतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱयाचे निवृत्ती वेतन वेळेत अदा करण्यासाठी बॅकेतील खाते क्रमांक तसेच विविध माहिती जमा करण्याची सुचना करण्यात आली आहे. तसेच एंशी वर्षावरील निवृत्त कर्मचाऱयांना 20 टक्के ते 100 टक्के वाढीव निवृत्ती वेतन देण्याचा आदेश बजावला आहे.
केंद्रीय निवृत्त कर्मचाऱयांना आणि त्यांच्या वारसदारांना वेळेत निवृत्ती वेतन देण्यासाठी दरवषी हयातीचा दाखला तसेच बॅकेतील खात्याचा क्रमांक द्यावा लागतो. पण त्याच बरोबर वर्षभरात कोणतेही बदल झाल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. निवृत्ती कर्मचाऱयांनी एwंशी वय गाठल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाकरिता तसेच औषधोपचाराकरिता निवृत्ती वेतनात टप्याटप्याने वाढ करण्यात आली आहे. एwंशी ते 100 वर्षे वयापर्यत निवृत्ती वेतनात 20 ते 100 टक्केपर्यत वाढ करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. निवृत्त कर्मचाऱयांच्या वयात वाढ झालेल्या दिवशीपासून निवृत्ती वेतनात वाढ करणे बंधनकारक असल्याचा आदेश शासनाने बजावला आहे.
बॅकेतील खात्याच्या माहितीसह निवृत्त कर्मचाऱयाच्या कुंटूंबाची माहिती, निवृत्ती नंतर प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून रूजू झाल्यास त्याचा तपशील द्यावा लागणार आहे. निवृत्ती नंतर पुन्हा दुसऱया नोकरीवर रूजू झाल्याची माहिती देणे आवश्यक आहे. पुर्नविवाह प्रतिज्ञापत्र, अपंगत्व आल्यास त्याबाबतचा दाखला, हयात दाखला आदी विविध दाखले नोव्हेबर महिन्यात जमा करून घेणे आवश्यक आहे. याकरिता सबंधित बॅकाकडून निवृत्त कर्मचाऱयांना दि. 24 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेबर अशा चार टप्यात नोटीस किंवा एसएमएस व्दारा दाखले जमा करण्यासाठी सुचना करण्यात यावी. तसेच बॅकांनी निवृत्ती कर्मचाऱयांच्या घरी जावून कागदपत्रे जमा करून घ्यावीत या सेवेकरिता 60 रूपयापेक्षा जास्त सेवा कराची आकारणी करू नये अशी सुचना करण्यात आली आहे. सदर सुचना विविध खात्याच्या कार्यालयांना देण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.