कुटुंबीयांना कोरोनापासून वाचविण्याचा हेतू
कोरोनाकाळात अनेक घटनांनी लोकांना भावुक केले. कुठे परिचारिका स्वतःच्या मुलांना कित्येक दिवसांनंतर भेटत होती. तर काहीजण स्वतःच्या नातवंडांना एक वषांनंतर भेटत हेते. अशा क्षणांमध्ये सर्वांचे डोळे पाणावले. स्वकीयांची काळजी घेण्यासाठीच लोकांनी त्यांच्यापासून अंतर राखले होते. अमेरिकेत डॉ. टिफिनी ओसबॉर्न एक वर्षापर्यंत कॅम्पर (विशेष प्रकारची कार) मध्ये राहिल्यावर अखेर स्वतःच्या घरी पोहोचल्या आहेत. कोरोनावरील लस घेतल्यावरच त्यांनी घरात पाऊ ठेवले आहे.
सेंट लुईसमध्ये राहणाऱया डॉ टिफिनी मागील एक वर्षापासून कोरोनाबाधितांची देखभाल करत होत्या. यादरम्यान त्या रुग्णालयातच रहायच्या किंवा घराबाहेरील कॅम्परमध्ये वास्तव्य करायच्या. या पूर्ण वर्षात स्वतःचा पती तसेच दोन मुलांनाही त्या भेटायल्या गेल्या नाहीत. कुटुंबीयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलावे लागले होते. त्या बर्न्स ज्युइश हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये कार्यरत आहेत. मार्च 2020 मध्ये कुटुंबीयांपासून दूर राहिले होते. सुरक्षित अंतर राखून कुटुंबीयांना भेटत होते. पण घरात जाता येत नव्हते असे त्या सांगतात कोरोनावरील लस घेतल्यावरही त्या सर्व प्रकारची खबरदारी घेत आहेत. त्यांनी शूज गॅरेजमध्येच काढून ठेवत थेट बाथरुममध्ये प्रवेश केला.