भारतीय फंड उद्योगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे
मुंबई
जागतिक पातळीवरील सर्वात मोठी फायनान्शिअल कंपनी एचएसबीसीने लार्सन ऍण्ड टुब्रो म्युच्युअल फंडची खरेदी केली आहे. सदरचा व्यवहार हा 3,200 कोटी रुपयांमध्ये झाला आहे. हा भारतीय फंड उद्योगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे.
या खरेदीच्या व्यवहारानंतर आता एचएसबीसी म्युच्युअल फंड उद्योगामध्ये 12 व्या नंबरची कंपनी बनणार आहे. देशातील एकूण 43 फंड हाऊस फंड आहेत.
मंजुरी घ्यावी लागणार
या व्यवहार पूर्ण होण्यासाठी रेग्युलेटरीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे लार्सन ऍण्ड टुब्रो म्युच्युअल फंडच्या फिडिलिटीचा भारतीय व्यवसाय खरेदी केला होता. तेव्हापासून कंपनी सलगपणे तेजीचा प्रवास करत राहिली आहे.