बेंगळूर
आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीसने जून 2020 ला संपलेल्या तिमाहीत 31 टक्के इतका निव्वळ नफा कमावला आहे. दुसरीकडे कंपनीचे चेअरमन शिव नाडर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आयटी कंपनी एचसीएलने जूनअखेर 2925 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीचा महसूल 8 टक्क्मयांनी वाढून 17841 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वषी हाच महसूल 16425 कोटी रुपयांचा होता तर निव्वळ नफा मागच्या वषी 2220 कोटी रुपयांचा मिळवला होता. दरम्यान शिव नाडर यांच्या जागी आता रोशनी नादर मल्होत्रा ही कंपनीचे चेअरमनपद सांभाळणार आहे.