वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपीच्या सोमवारी घोषित करण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या राफेल नदालने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. गेल्या आठवडय़ात नदालने इटालियन टेनिस स्पर्धा जिंकताना सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचचा पराभव केला होता. या जेतेपदानंतरही नदालच्या मानांकनातील स्थानामध्ये कोणताच बदल झाला नाही.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच 11063 गुणांसह पहिल्या, रशियाचा मेदव्हेदेव 9793 गुणांसह दुसऱया, स्पेनचा नदाल 9630 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 8445 गुणांसह चौथ्या, ग्रीकचा सिटसिपेस 7430 गुणांसह पाचव्या, जर्मनीचा व्हेरेव्ह 7115 गुणांसह सहाव्या, रशियाचा रूबलेव्ह 6090 गुणांसह सातव्या, स्वीसचा रॉजर फेडरर 5605 गुणांसह आठव्या, इटलीचा बेरेटेनी 3958 गुणांसह नवव्या आणि अर्जेंटिनाचा शुवार्त्झंमन 3465 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.