वृत्तसंस्था/ पॅरिस
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत रशियाच्या डॅनियल मेदव्हेदेवने स्वीसच्या अनुभवी रॉजर फेडररला मागे टाकत चौथे स्थान मिळविले. मेदव्हेदेवने रविवारी येथे पॅरीस मास्टर्स पुरूषांची टेनिस स्पर्धा जिंकताना जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हचा पराभव केला.
ताज्या एटीपी मानांकन यादीत सर्बियाचा जोकोव्हिच 11830 गुणांसह पहिल्या, स्पेनचा नदाल 9850 गुणांसह दुसऱया, ऑस्ट्रीयाचा डॅमिनिक थिएम 9125 गुणांसह तिसऱया, रशियाचा डॅनिएल मेदव्हेदेव 6970 गुणांसह चौथ्या, स्वीसचा रॉजर फेडरर 6630 गुणांसह पाचव्या, ग्रीकचा सित्सिपस 5925 गुणांसह सहाव्या, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह 5525 गुणांसह सातव्या, रशियाचा रूबलेव्ह 3919 गुणांसह आठव्या, अर्जेंटिनाचा श्वार्ट्झमन 3455 गुणांसह नवव्या आणि इटलीचा बेरेटेनी 3075 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. स्वीसचा 39 वर्षीय रॉजर फेडरर 2020 च्या संपूर्ण टेनिस हंगामात दुखापतीमुळे उपलब्ध होवू शकला नाही. सर्बियाच्या जोकोव्हिचने वर्षअखेरीस एटीपीच्या मानांकनात सहाव्यांदा अग्रस्थान राखले आहे. येत्या रविवारपासून लंडनमध्ये सुरू होणाऱया एटीपी टूरवरील पुरूषांच्या अंतिम स्पर्धेत जोकोव्हिचला अग्रस्थान देण्यात आले आहे.