नवी दिल्ली
एनएमडीसी कंपनीने मंगळवारी आपल्या लोहखनिजाच्या किमती वाढवल्या असल्याचे म्हटले आहे. लोहखनिजाची प्रति टन किंमत 400 रुपयांनी वाढली असून 6 हजार रुपये प्रति टन असा नवा दर झाला आहे.आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत तिसऱयांदा अशा प्रकारे किंमती वाढवण्यात आल्या आहेत. एप्रिल ते फेब्रुवारी 2021-22 कालावधीत एनएमडीसीचे लोहखनिजाचे उत्पादन 26 टक्के वाढले आहे.