बेळगाव : जाधवनगर येथील एनसीसी ग्रुपच्यावतीने 72 वा एनसीसी दिन साजरा करण्यात आला. या निमित्त दि. 23 व 24 नोव्हेंबर रोजी आरएलएस महाविद्यालयात 2 दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एनसीसी छात्रांनी रक्तदान हे सर्वश्रे÷ दान म्हणून रक्तदान केले. दि. 25 व 26 रोजी आरएलएस महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
यावेळी एनसीसी ग्रुप ऑफ बेळगावचे श्रीनिवास अभय अवस्थी यांच्यासह 35 जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. संकलित केलेले रक्त बिम्स हॉस्पिटलला देण्यात आले. सदर शिबिर इन्चार्ज ऑफिसर डॉक्टर श्रीदेवी आणि मेडिकल स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.