नवी दिल्ली
भारतात नोकर भरती प्रक्रियेत एप्रिल महिन्यात घट झाली असल्याची माहिती नोकरीसंदर्भातील पोर्टल नोकरीडॉटकॉम यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे नोकऱयांवर परिणाम झाला आहे. विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे व्यवहारांवर परिणाम झाला आहे. दरम्यान नोकरीडॉटकॉमच्या मते, एप्रिल 2021 मध्ये नोकर भरतीत 15 टक्के इतकी घट झाली आहे. मार्चच्या तुलनेत ही घट नोंदली गेली आहे. एप्रिलमध्ये 2 हजार 072 जणांची भरती करण्यात आली आहे, तर मार्चमध्ये 2 हजार 436 जणांची भरती करण्यात आली होती.