वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मोबाईल क्षेत्रातील शाओमी कंपनीचा एमआय 11 लाइट हा स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात दाखल करण्यात आला आहे. सदरचा फोन हा 64 एमपी मुख्य कॅमेऱयासह येणार आहे.
शाओमी कंपनीने सदरचा फोन हा परवडेल अशा किंमतीला उपलब्ध केला आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 21 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. शाओमीचा भारतात हा चौथा परवडणाऱया किंमतीचा फोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याआधी एमआय 11 सिरीजअंतर्गत कंपनीने एमाआय 11 एक्स, एमआय एक्स प्रो आणि एमआय 11 अल्ट्रा हे फोन सादर केले होते. वजनाला हलका असणारा हा नवा एमआय 11 लाइट स्मार्टफोन पातळ आहे. सदरचा फोन 4 जी आणि 5 जी गटात जागतिक स्तरावर बाजारात सादर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदरचा फोन वन प्लस नॉर्ड सीई 5 जी आणि आयक्यूओओ झेड 3 यांना टक्कर देईल असं सांगितलं जात आहे. 90 हर्टझ अमोलेड डिस्प्ले याला असून क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 732 जी प्रोसेसर आणि 64 मेगापिक्सल ट्रीपल रिअर कॅमेरा या स्मार्टफोनला असणार आहे. 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजचा फोन 21 हजार 999 रुपयांना आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजचा फोन 23 हजार 999 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. सदरचा फोन हा ग्राहकांना सुरूवातीला 1500 रुपयांच्या सवलतीत घेता येणार आहे. टस्कनी कोरल, झॅज ब्ल्यू विनी ब्लॅक या रंगात हे स्मार्टफोन येणार आहेत.