बेंगळूर/प्रतिनिधी
एमबीबीएस, बीडीएस परीक्षा स्थगितीसाठी विद्यार्थी अजूनही आंदोलने करत आहेत. राजीव गांधी आरोग्य विज्ञान संस्था (आरजीयूएचएस) च्या विद्यार्थ्यांच्या निषेधानंतर बीडीएसच्या पहिल्या ते तृतीय वर्षाच्या परीक्षा स्थगित करून आरजीयूएचएसने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परंतु बीडीएस चतुर्थ वर्षाची आणि एमबीबीएस परीक्षा वेळेत घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आरजीयूएचएसने परीक्षा पुढे ढकलण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा ती ऑनलाईन आयोजित करण्याची मागणी केली आहे.
एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने दोन्ही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांवर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा समान धोका आहे, मग ते बीडीएस असो वा एमबीबीएस कोरोना संसर्ग तर होणारच असे म्हंटले आहे. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव एन. रामकृष्ण रेड्डी यांनी बीडीएस चतुर्थ वर्षाची परीक्षा १४ ऑक्टोबरपासून तर एमबीबीएस परीक्षा १३ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
डॉ.के.एम. सुधाकरसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्यास तयार नाहीत.मंत्री सुधाकर यांच्या मते, जेव्हा कर्नाटकमध्ये दहावीची परीक्षा घेता येते, तेव्हा एमबीबीएस विद्यार्थ्यांनी मागे हटू नये त्यांनीही परीक्षा द्यावी असे म्हंटले आहे.