मुंबई
भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापकांपैकी एक एल अँड टी म्युच्युअल फंडने कर कमी करण्याच्या अनुषंगाने इक्वीटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ईएलएसएस) लवकर गुंतवणूक करण्याचे महत्व सांगण्यासाठी एक एकात्मिक डिजिटल मोहीम ‘लेट लतीफ 2021’ सादर केली आहे. या मोहिमेची थीम दैनंदिन जीवनात महत्वाच्या कामाला होणारा विलंब आणि त्यामुळे होणारे वाईट परिणाम याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे ही आहे. या डिजिटल मोहिमेच्या माध्यमातून फंड हाऊस हजारो वापरकर्त्यांपर्यंत पोहचण्याची देखील त्यांची योजना आहे, ज्यांना त्यांचा कर कमी करण्यासाठी गुंतवणुकीचे एक साधन म्हणून ईएलएसएसमध्ये रुची आहे. जे जीवनाच्या सुरुवातीला त्यांच्या संपत्ती-निर्मितीचा प्रवास सुरू करण्यासाठी ईएलएसएसचा गुंतवणुकीचे साधन म्हणून उपयोग करू शकतील.