मुंबई
रंग उत्पादक कंपनी एशियन पेंटस्ला डिसेंबर तिमाहीअखेर 62 टक्के इतका नफा प्राप्त झाला आहे. कंपनीचा नफा 1265.35 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्याच वषी या समान कालावधीमध्ये कंपनीला 779 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकत्रित उत्पन्न 25 टक्क्यांनी सुधारून 6886 कोटी रुपये झाले आहे. मागच्या वषी याच कालावधीत ते 5490 कोटी रुपये इतके होते. घरगुती रंगाची मागणी दरम्यानच्या काळात वाढल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे रंगाच्या किमतीही 30 टक्क्मयांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.