प्रतिनिधी/ सातारा
एस, टी कामगार प्रश्नांन बाबत काही अधिकारी अन्यायकारक भूमिका घेत आहेत. या संदर्भात एस. टी. कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह भोसले व संघटनेचे सर्व विभागीय पदाधिकारी यांनी या बाबत राज्याचे डॅशिंग मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार केली त्या वेळी मंत्री देसाई यांनी विभागनियंत्रक व संबंधित अधिकाऱयांची तसेच संघटनेच्या पदाधिकाऱयांची एक सयुक्त तातडीची बैठक दौलतनगर पाटण येथे घेतली. त्या बैठकीत त्यांनी सुचना दिल्या.
या वेळी कामगार हिताचे अनेक प्रश्न समोर आले. त्याप्रसंगी मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱयांना येत्या आठ दिवसात कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन ते त्वरित मार्गी लावावेत कामगारांवर अन्यायकारक भूमिका अधिकाऱयांनी घेऊ नये नाहीतर गाठ माझ्याशी आहे. या बैठकी वेळी एस, टी कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रामभाऊ रैनाक, कार्याध्यक्ष शिवाजी देसाई, प्रमुख सल्लागार पी.एस. सपकाळ, सहसचिव पवन फाळके, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील आदी उपस्थित होते. एसटी कामगार सेनेच्यावतीने एसटी कर्मचाऱयांच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यावर अधिकाऱयांकडून कर्मचाऱयांची हराशमेंट केली जाते. जे कामचुकार कर्मचारी आहेत त्यांना मात्र सवलत दिली जाते. संघटनेचेच कामगार असतील त्यांनाच नाहकपणे अधिकाऱयांकडून त्रास दिला जातो, अशी तक्रार मांडण्यात आली. त्यावर मंत्री देसाई यांनी एसटीचा चालक असो वा वाहक हे माझे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही. त्यांना अशा शब्दात सुनावले. त्यावरुन अधिकाऱयांनी यापुढे असे काही होणार नाही, संबंधितास सुचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. .