नवी दिल्ली
एसर कंपनीने आपला नवा ‘नित्रो 5’ हा गेमिंग लॅपटॉप भारतात दाखल केला आहे. ज्याची किंमत 69 हजार 999 रु. असेल.इंटेल टायगर लेक सीपीयू व जीई फोर्स जीटीएक्स ग्राफिक्स कार्डसह सदरचा लॅपटॉप दाखल झाला आहे. एचडी रेजिल्युशनसह डीटीएस एक्स अल्ट्रा साऊंड फिचर, एचडी वेबकॅम व कीबोर्डसहीत आरजीबी बॅक लाइटिंगची सुविधा यात आहे. 69 हजार 999 रुपये किंमत असणारा हा लॅपटॉप ग्राहकांना ऍमेझॉन वा एसरच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुक करता येणार आहे. इंटेलकोर 15 प्रोसेसर तसेच 8 जीबी व 512 जीबी एसएसडी स्टोरेजसह हा लॅपटॉप येईल.