नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीत पुन्हा एकदा घसरणीची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयाने दिली आहे. पेट्रोलियम उत्पादन, रत्न व आभूषण तसेच लेदर क्षेत्रातील शिपमेंटमध्येही झालेल्या घसरणीच्या कारणामुळे ऑक्टोबरमध्ये वस्तू निर्यातीत 5.4 टक्क्यांची घसरण होऊन 24.82 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये भारताने 26.23 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती. आयात मागील महिन्यात 11.56 टक्क्यांनी घटून 33.6 अब्ज डॉलर्सवर आली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीत भारताने 150.07 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे.
व्यापारात 25.34 टक्क्यांची घसरण
ऑक्टोबरमध्ये भारताची निव्वळ आयात आणि याच दरम्यान देशाला 8.78 अब्ज डॉलर्सचा व्यापारी तोटा झाला आहे. मागील वर्षातील समान कालावधीत हा तोटा 11.76 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. याप्रमाणे व्यापारी तोटय़ामध्ये 25.34 टक्क्यांची कमी आली आहे.