सध्याच्या कोरोनाच्या काळात पल्स ऑक्सीमीटरचा वापर वाढत आहे. हे डिव्हाईस रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि हृदयाच्या ठोक्यांची माहिती देते.
- या डिव्हाईसवर केवळ बोट ठेवल्यानंतर या दोन्हींविषयीची माहिती मिळते. यासाठी रक्ताचा नमुनाही द्यावा लागत नाही किंवा कसला त्रासही होत नाही.
- या डिव्हाईसमध्ये दोन ठिकाणी आकडे दिसतात. त्यातील वरील बाजूस असणारे रीडिंग हे रक्तातील ऑक्सिजनचे असते; तर खालील बाजूस दिसणारे रिडिंग हृदयाच्या ठोक्यांचे असते.
साधारणतः रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण 94-100 असायला हवे. कधी 93 पर्यंतही चालते. पण 90 च्या खाली मात्र तातडीने रुग्णालयात जायला हवे.
- अर्थात काही काळासाठी ही पातळी कमी असेल तर फारशी चिंता करण्याचे कारण नाही. पण दीर्घकाळ जर ती स्थिती कायम असेल तर मात्र ते धोकादायक ठरु शकते. विशेषतः सध्याच्या कोरोनाच्या काळात अशा व्यक्तींनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे ईष्ट ठरते.
- ज्या व्यक्तींना श्वसनाशी संबंधित अथवा अन्य आजार आहेत त्यांच्यामध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी दिसून येते. ङहल्ली अनेक सोसायटय़ांमध्ये असे डिव्हाईस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे लोक स्वतःच चाचणी करत आहेत. परंतु डिव्हाईसवरील आकडे पाहून लागलीच घाबरुन जाऊ नये. काही वेळा अशा यंत्रांत बिघाड असण्याचीही शक्यता असते. काही वेळा मशिनला बोट नीट लावले नसेल, हाताला नेलपॉलिश वा मेहंदी लावली असेल तरीही ऑक्सिजन पातळी कमी दाखवली गेल्याचे दिसून आले आहे.