नवी दिल्ली
केंद्र सरकार ऑटोमोबाईल क्षेत्राकरीता पीएलआय योजना आणण्याची तयारी करत असून याअंतर्गत 57 हजार कोटींच्या निधीचा उपयोग ऑटो उद्योगाला करून घेता येणार आहे. स्थानिक ऑटो क्षेत्राला गती देण्यासाठी सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते. उत्पादन व विक्रीच्या आधारावर 57 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. वाहन उद्योगाला उभारी देण्यासाठी पीएलआय प्रोत्साहन योजना आणण्यासाठी सरकारने गतीने पावले उचलली असल्याचे समजते. स्थानिक स्तरावर उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.