वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
जगातील महागडय़ा गाडय़ांची निर्मिती करणारी कंपनी म्हणून जर्मनीच्या ऑडीला ओळखण्यात येते. याच कंपनीने गुरुवारी भारतीय बाजारात आपली नवीन कार एसयूक्ही ऑडी आरएस क्मयू-8 उतरवली आहे. सदर कारची किमत 2.07 कोटी रुपयांपासून पुढे सुरु होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
ऑडी आरएस क्मयू-8 टर्बो 4 लिटर पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आली आहे. तसेच यांची शक्ती जवळपास 600 हॉर्स पॉवर इतकी असल्याचेही स्पष्ट केले आहे. म्हणजे ही कार चार सेकंदामध्ये शून्य ते 100 किमी प्रति तास धावणार असल्याचे म्हटले आहे. हे मॉडेल म्हणजे ऑल इन वन असून ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास कंपनीचे भारतातील प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनी व्यक्त केला आहे.