पोर्तुगालमध्ये बॉसला ठेवावे लागणार वेळेचे भान
ऑफिस आवरनंतर (कार्यालयीन वेळ) बॉसकडून कर्मचाऱयाला फोन किंवा मेसेज करणे आता बेकायदेशीर असणार आहे. पोर्तुगालमध्ये याकरता रितसर कायदा तयार करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत कार्यालयीन वेळ सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर स्वतःच्या कर्मचाऱयांना कामासाठी फोन/मेसेज किंवा ईमेल करणाऱया बॉसला शिक्षा होणार आहे.
पोर्तुगालच्या संसदेत संमत नव्या नियमांच्या अंतर्गत कंपन्या ऑफिस आवरनंतर आणि वीकेंडदरम्यान स्वतःच्या कर्मचाऱयांना कॉल किंवा ईमेल केल्यास त्यांना दंडाला तोंड द्यावे लागणार आहे. कोरोना महामारीनंतर वाढलेल्या वर्क फ्रॉम होम संस्कृतीनंतर देशातील सत्तारुढ पक्षाकडून हा नवा कामगार कायदा सादर करण्यात आला आहे.
या कायद्याच्या अंतर्गत वर्क फ्रॉम होमदरम्यान कंपन्यांना वीज आणि इंटरनेट बिल इत्यादींचा खर्च उचलावा लागणार आहे. नव्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱयाचे मूल लहान असल्यास तो 8 वर्षांचा होईपर्यंत कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू शकतो. पण पोर्तुगालच्या कामगार कायद्यांमध्ये झालेली ही दुरुस्ती 10 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांवर लागू होणार नाही.
कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम नवी वस्तुस्थिती ठरली आहे. याचमुळे रिमोट वर्किंगला अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा अध्यादेश आणला गेला आहे. अशाप्रकारचे कायदे अनेक युरोपीय देशांमध्ये आहेत. फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्लोवाकियामध्ये अशा कामगार कायद्यांना अनुमती देण्यात आली आहे. पोर्तुगालमध्ये कर्मचाऱयांना तंदुरस्त ठेवण्यासाठी सरकारने हा पुढाकार घेतल्याचे विधान कामगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्री एना मेडेंस गोडिन्हो याहंनी केले आहे.