ऑनलाईन टीम / टोकियो :
भारताची युवा बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने महिला बॉक्सिंगमधील 69 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत तैपईची चिन चेन निएन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे तर लव्हलिनासाठी पहिले पदक निश्चित झाले आहे.
बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहेनने तैपईची माजी जगज्जेती चिन चेन निएनवर सरशी साधत 4-1 ने मात केली.