ऑनलाईन टीम /मुंबई
‘ऑस्कर’ हा सिने जगतातील सन्मान समजला जातो. जगातील अगदी कमी कलाकार ऑस्करच्या नामांकन यादीपर्यंत पोहचात. परंतु ए .आर रहमान. नी हे करून दाखवलं. आपल्या अप्रतिम संगीताच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी २००९ साली थेट ऑस्कर पुरस्कार मिळवला. ए. आर. रेहमान यांच्या गाण्यांची नोंद पाश्चात्य प्रेक्षकांनाही घेण्यास भाग पाडले.
गेल्या ९० वर्षात ऑस्कर पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले आणि एकमेव संगीतकार आहेत. रेहमान यांनी एका वर्षात तब्बल दोन ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. तसेच चित्रपटातील बॅकराऊंड स्कोअरसाठी देखील त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केले गेले. रेहमान यांनी त्यानंतर अनेक चांगल्या गाण्यांची निर्मिती केली. २०११ साली त्यांना ‘इफ आय राईस’ व ‘आर्स’ या दोन गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट गाणे या विभागात ऑस्कर नामांकन मिळाले होते.