ऑनलाईन टीम / व्हिएन्ना :
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह सात जण ठार झाले. तर काही जण जखमी झाले आहेत.
ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहामूर यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी व्हिएन्नामध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. अतिरेक्याच्याच शरीराला बॉम्ब लावण्यात आला होता. बॉम्ब निकामी करण्यात बॉम्ब नाशक पथकाला यश आले. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. ऑस्ट्रीयातील गृहमंत्रालयाच्या टीमने हा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितले आहे.