वृत्तसंस्था/ सिंगापूर
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील सिंगापूर खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्सी पॉपरिनने कझाकस्तानच्या बुबलीकचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. पॉपरिनचे एटीपी टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात पॉपरिनने बुबलीकचा 4-6, 6-0, 6-2 असा पराभव केला. या सामन्यात पॉपरिनने 11 बिनतोड सर्व्हिसची नेंद केली. 21 वर्षीय पॉपरिनने या स्पर्धेत क्रोएशियाच्या सिलीकचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.