वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी कर्णधार बॅरी जार्मन यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 1959 ते 1969 या दशकामध्ये 19 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी 191 प्रथमश्रेणी समाने 13 क्रिकेट हंगामात खेळले आहेत. 1959 साली भारताच्या दौऱयावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातर्फे बॅरी जार्मन यांनी कानपूरच्या कसोटीत आपले कसोटीत पदार्पण केले होते.
बॅरी जार्मन हे फलंदाज आणि यष्टीरक्षक होते. 1967-68 च्या क्रिकेट हंगामात जार्मन यांनी ऑस्ट्रेलियन संघातील भरवंशाचे फलंदाज म्हणून कामगिरी केल्याने त्यांनी संघातील आपले स्थान मजबूत केले. ऍशेस मालिकेत हेडिंग्लेच्या कसोटीत नियमीत कर्णधार बिल लॉरी यांच्या गैरहजेरीत जार्मन यांच्याकडे ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. त्यांनी आपली शेवटची कसोटी ऍडलेडच्या मैदानावर विंडीज विरूद्ध खेळली होती. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते आयसीसीच्या पंच पॅनेलमध्ये सामनाधिकारी दाखल झाले. त्यांनी 2001 सालापर्यंत 25 कसोटी आणि 28 वनडे सामन्यात सामनाधिकारी ही कामगिरी बजावली. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे जार्मन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.