प्रतिनिधी/ बेळगाव
मूळचे माणगाव ता. चंदगड येथील असणारे नांदोडकर परिवार मागील 10 वर्षांपासून नोकरी निमित्त मेलबर्न, ऑस्टेलिया येथे स्थायिक झाले आहेत. महादेव नांदोडकर यांच्या कन्यांनी मेलबर्न येथे सुबक असा मातीचा किल्ला तयार केला आहे. त्यांनी सिंधुदूर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे.
महादेव यांच्या कन्या ओमी व उरवी यांनी इंटरनेटवरून माहिती जमा करून हा किल्ला बनविला आहे. आपल्या गावाकडच्या आठवणी, संस्कार त्यांनी सातासमुद्रापारही जपले आहेत. याकामी महादेव यांनी त्यांना मदत केली आहे.