1985 पासून कंपनीत कार्यरत : विविध पदावर कार्यरत राहिल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओएनजीसीने डॉ. अल्का मित्तल यांच्याकडे कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. अल्का या भारताच्या सर्वात मूल्यवान पीएसयू ओएनजीसीच्या पहिल्या महिल्या ठरणार आहेत. ओएनजीसीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार हे 31 डिसेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
सधारणपणे सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संचालक किंवा अध्यक्ष सेवा निवृत्त झाल्यानंतर कमीत-कमी दोन महिन्यांनी नव्या अधिकाऱयांची घोषणा केली जाते. परंतु ओएनजीसी संदर्भात असे काही झाले नाही. डॉ. अल्का मित्तल यांची 48 तासांत ओएनजीसीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
कोण आहेत डॉ. अल्का ?
डॉ. अल्का मित्तल यांच्याकडे अर्थशास्त्रामधील पदवी असून, एमबीए व कॉमर्स व बिजनेसमधील डॉक्टरेट आहे. मित्तल 1985 मध्ये ट्रेनी म्हणून ओएनजीसीमध्ये रुजू झाल्या होत्या. मित्तल या नोव्हेंबर 2018 मध्ये ओएनजीसीच्या एचआर राहिल्या असून ओएनजीसीच्या इतिहासामधील पूर्णवेळ हे पद सांभाळणाऱया पहिल्या महिला ठरल्या आहेत.