आगामी बहुचर्चित ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाच्या निर्मितीसाठी तब्बल 465 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 3 हजार 408 केटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याचमुळे ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटीच्या जगतातील ही आजवरची सर्वात मोठी आणि प्रचंड महागडी सीरिज असल्याचे बोलले जात आहे.
या सीरिजचे एकूण 5 सीझन असणार आहेत. ‘द लॉर्ड ऑफ रिंग्ज’चे बजेट खूप मोठे आहे. लोकेशन, वेशभूषा, रंगमंच आणि इतर निर्मितीमूल्याचा खर्च खूप आहे. ही एक वास्तविक वेबसीरिज ठरणार असल्याचे उद्गार अमेझॉन स्टुडिओचे प्रमुख जेनियर सल्के यांनी काढले होते.
दरम्यान आजवरची सर्वाधिक लोकप्रिय मालिका असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ पेक्षाही ‘द लॉर्ड ऑफ रिंग्ज’ अधिक महागडी वेबसीरिज ठरणार असल्याची चर्चा आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या एका सीझनसाठी सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सचा खर्च करण्यात आला होता. लॉर्ड ऑफ रिंग्जच्या पहिल्या सीझनच्या खर्चाच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता लागून राहिली आहे.