गिजमोचाइनाच्या अहवोलातून माहिती – 50 एमपीचा उत्तम क्षमतेचा कॅमेरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनची स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी ओप्पो येणाऱया महिन्यात आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात सादर करण्याचे संकेत आहेत. कंपनीने याचे कोडनाव ‘पीकॉक’ असे ठेवले आहे. चीनची नवीन टेक्नॉलॉजी ट्रक करणारी वेबसाइट गिजमोचाइनाच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. या वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे ओप्पोच्या फोल्डेबल फोनमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 3 आणि हुआई मेट एक्स2 यासारखे इनवर्ड फोल्डिंग डिझाईन मिळणार आहे.
सदरचे उपकरण हे 8 इंच एलटीपीओ म्हणजे लो टेम्परेचर पॉली क्रिस्टलाईन ऑक्साइड ओल्ड पॅनेलसोबत मिळणार आहे. जो 120 डब्लू रिप्रेश देत आहे. स्नॅपड्रगन 888 मोबाईल प्लॅटफॉर्मवर राहते.
50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा
डिव्हाईस कलर ओएस 12 सोबत प्रीइंस्टॉल राहणार आहे. यामध्ये अँड्रॉईड 11 राहणार असून लेटेस्ट अँड्रॉईड 12 वर अपडेट राहणार आहे. या उपकरणात सोनी आयएमएक्स766 ला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार असल्याचे संकेत आहेत. यासह 4,500 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.
शाओमीही आणणार फोल्डेबल फोन
यासोबत आता शाओमीही या क्षेत्रात उतरणार आहे. चार महिन्या अगोदर शाओमीने मी मिक्स नावाचा फोल्डेबल फोन आणणार असल्याची माहिती आली होती. क्लॅमशेल फोल्डिंग डिझाईनसोबत पहावयास मिळणार आहे. सदरची किमत ही 1 लाख रुपयापेक्षा अधिक राहील.