ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय.
आज पुन्हा कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 373 वर पोहोचली आहे.
17 पैकी 7 जण जयभीम नगर, दत्त नगर – कैलास नगरमध्ये 4 जण, कबडीपुरा येथे 5, बायजीपुरा मध्ये 5, संजयनगर, मुकुंदनगर येथे 7 जण, पुंडलिक नगर मध्ये 3 जण, तर अन्य बेगमपुरा, रेल्वे स्टेशन परिसर, कबीरनगर, उस्मानपुरा, सातारा रोड परिसर मध्ये प्रत्येकी 1 रुग्ण वाढला आहे. यामध्ये 10 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे.
औरंगाबादेत रुग्णांची वाढती संख्या पाहता संचार बंदी आता अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 28 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.