वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कन्नड सक्ती विरोधी आंदोलनामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना कंग्राळी बुद्रुक म. ए. समिती व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार दि. 1 रोजी हिंडलगा येथे अभिवादन करण्यात आले.
कर्नाटक सरकारने 1 जून 1986 रोजी सीमाभागातील मराठी भाषिकांवर कन्नड सक्ती लागू केली. त्याविरोधात मराठी भाषिकांतून तीव्र आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनामध्ये कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर गोळीबार केला. त्यामध्ये अनेक जण हुतात्मा झाले. यावेळी म. ए. समिती कार्यकर्ते मयूर बसरीकट्टी, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, मल्लाप्पा पाटील, तानाजी विठ्ठल पाटील, व्यंकट पाटील, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.