स्थानिक रहिवाशांमधून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
मागील कित्येक दिवसांपासून धोकादायक स्थितीत असलेला खडक गल्ली कॉर्नरजवळील व कचेरी रोडवरील वृक्ष अखेर वनखात्याने हटविला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
कचेरी रोडवरील धोकादायक वृक्ष होता, तो हटवावा अशी मागणी येथील रहिवाशांनी वन विभागाकडे केली होती. मात्र मागील काही दिवसांपासून दुर्लक्ष झाले होते. अखेर सोमवारी वनखात्याच्या कर्मचाऱयांनी लॉकडाऊन काळात वृक्ष हटविण्याचे काम हाती घेतले. गल्लीत असणाऱया आस्थापनांना हा वृक्ष धोकादायक होता. शिवाय झाडाच्या फांदा विद्युत तारांना स्पर्श करून गेल्या होत्या. त्यामुळे वारंवार शॉटसर्किटचे प्रकार घडते होते. त्यामुळे रहिवाशांनी हा वृक्ष हटवावा, अशी मागणी वनविभागाकडे केली होती. दरम्यान, वृक्ष हटविल्याने गल्लीने मोकळा श्वास घेतला आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे वृक्ष हटविताना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.