शुक्रवारी 1142 रुग्ण, उपनगरांमध्येही फैलाव , मृत्यूचे प्रमाणही अधिकच
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात 10 मे पासून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कोरोना महामारीचा वाढता फैलाव थोपविण्यासाठी 7 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. तरीही गेल्या पंधरवडय़ात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने रोज हजाराचा आकडा पार केला आहे. त्यामुळे साहजिकच प्रशासनाची चिंता वाढली आहे. खास करुन बेळगाव तालुक्मयात रोज 400 ते 500 रुग्ण आढळून येत आहेत. शहर व उपनगरांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या पंधरवडय़ात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र एक दिलासादायक गोष्ट म्हणजे बरे होणाऱया रुग्णांची टक्केवारी 70.3 टक्क्मयांवर आहे.
शुक्रवारी 1142 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 430 जणांचा समावेश आहे. वडगाव, शहापूर, खासबाग, टिळकवाडी, महांतेशनगर, सदाशिवनगर परिसरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या आठवडय़ाभरातील आकडेवारी लक्षात घेता रोज सरासरी 10 ते 15 जण कोरोनामुळे दगावत आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. रॅपिड ऍन्टिजेन व आरटीपीसीआर तपासणीत पॉझिटिव्ह येणाऱया रुग्णांचीच नोंद सरकारी दप्तरात होते. यापेक्षा अधिक जण रक्ततपासणी व एचआरसीटी करुन थेट उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची नोंद सरकारी यादीत होत नाही. त्यामुळे सरकारी आकडेवारी प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा वेगळी आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव
दुसऱया लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ग्राम पंचायत पातळीवर यंत्रणा राबविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेत लहान मुलांना त्रास होणार असा इशारा तज्ञ डॉक्टरांनी दिला असला तरी बेळगावसह कर्नाटकात सध्या लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत.
कोरोनामुक्त होणाऱया मुलांमध्ये वेगवेगळय़ा समस्या दिसून येत आहेत. बेळगाव शहर व जिल्हय़ात सरकारी आणि खासगी इस्पितळात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी ही व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. म्हणून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटरमधून बाधितांवर उपचार केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढतच चालल्यामुळे कडक लॉकडाऊन असतानाही रुग्ण संख्या कमी का होत नाही? असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेसमोर उपस्थित झाला आहे.
गेल्या आठवडय़ाभराची आकडेवारी लक्षात घेता 21 मे रोजी 1302, 22 मे रोजी 1109, 23 मे रोजी 1087, 24 मे रोजी 555, 25 मे रोजी 1131, 26 मे रोजी 1306, 27 मे रोजी 1277 व शुक्रवारी 28 मे रोजी 1142 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यावरुन गेल्या आठवडय़ाभरात केवळ एक दिवस वगळता रोज 1 हजारावर रुग्ण आढळून आले आहेत.
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी
कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात सकाळी 6 ते 10 पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. दिवसभरची गर्दी केवळ चार तासात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय रुग्णसंख्या घटणार नाही, असे सरकारी अधिकाऱयांचे म्हणणे आहे. ही गोष्ट खरी असली तरी खरेदीसाठी होणारी गर्दी व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन आणखी वाढवावा लागणार की काय? या विचारात सरकारी यंत्रणा आहे. सध्या तरी 7 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
नागरिकांनी नियम पाळावेत
या संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे म्हणाले, कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जारी केले आहे. तरीही बाजारपेठ किंवा रस्त्यांवर गर्दी झाली तर लॉकडाऊनचा उद्देश साध्य होत नाही. नागरिकांनी नियम पाळले तरच कोरोनावर मात करता येणार आहे.
शुक्रवारी 1456 रुग्ण कोरोनामुक्त
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनावर मात करणाऱयांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी 1456 जणांनी कोरोनावर मात केली असून 1142 नवे रुग्ण आढळून आले. तर गेल्या 24 तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 430 जणांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 62 हजार 777 जणांना कोरोनाची लागण झाली असून जिल्हय़ात 44,497 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 17 हजार 758 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध इस्पितळे व कोविड केअर सेंटरमधून उपचार करण्यात येत असून 14 हजारहून अधिक जण आपापल्या घरीच उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मृतांचा आकडा 522 वर पोहोचला आहे. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, रायबाग तालुक्मयातील प्रत्येकी दोन, गोकाक, व हुक्केरी तालुक्मयातील प्रत्येकी एक असे दहा जण दगावले आहेत. बेळगाव शहर व तालुक्मयात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.
अद्याप 2 हजार 653 जणांचे अहवाल यायचे आहेत. अद्याप 39 हजार 671 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 7 लाख 83 हजार 641 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 14 हजार 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. गेल्या पंधरवडय़ात रुग्णसंख्या व मृतांचा आकडाही वाढतो आहे.
शुक्रवारी सांबरा एटीएसमधील आणखी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 1142 बाधितांपैकी बेळगाव तालुक्मयातील 430 जणांचा समावेश असून शहर व उपनगरांमध्ये 295 व ग्रामीण भागात 135 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मुत्नाळ, के. के. कोप्प, हुदली, गौंडवाड, होनगा, आंबेवाडी, बस्सापूर, कंग्राळी बी. के., बडस, तारिहाळ, केदनूर, भेंडीगेरी, सांबरा, देसूर, पिरनवाडी, मोदगा, बसरीकट्टी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
कुदेमानी, हुलीकट्टी, मुतगा, पंतनगर, भुतरामहट्टी, मुतगा, धामणे रोड, शिंदोळी, विनायकनगर, पांगुळ गल्ली, बसवनगर, हनुमाननगर, शिवाजीनगर, पोलीस क्वॉर्टर्स, रामतीर्थनगर, राणी चन्नम्मानगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, सह्याद्रीनगर, साईनगर, खासबाग, शास्त्राrनगर, श्रीनगर, आनंदनगर, अनगोळ, अंजनेयनगर, अशोकनगर, आझमनगर, भाग्यनगर परिसरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
जुने बेळगाव, वंटमुरी कॉलनी, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, वंटमुरी जनता प्लॉट, बेकिनकेरे, कॅम्प, चव्हाट गल्ली, येळ्ळूर रोड-केशवनगर-वडगाव, उद्यमबाग, आदर्शनगर-वडगावसह परिसरातही कोरोना रुग्ण सापडले आहेत.