मडगाव : एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाला कडव्या झुंजीनंतर इराणच्या पर्सेपोलीस एफसीविरूद्ध 2-1 गोलानी पराभव स्वीकारावा लागला. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील सर्व गोल पहिल्या सत्रात झाले.
14व्या मिनिटाला एफसी गोवाचा कप्तान एदू बेडियाने गोल करून संघाला आघाडीवर नेले होते. मात्र, ही आघाडी केवळ चार मिनिटेच टिकली. 18व्या मिनिटाला मेहदी तोराबीने पर्सेपोलीसला पेनल्टीवर गोल करून बरोबरीवर नेले. त्यानंतर पर्सेपोलीस एफसी संघाच्या जलाल होसीने याने संघाचा विजयी गोल केला. या विजयाने पर्सेपोलीस एफसी संघाने या स्पर्धेत आपला सलग तिसरा विजय नोंदविला. मागील 2 सामने बरोबरीत सोडविलेल्या एफसी गोवाला तिसऱया लीग सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.