प्रतिनिधी / कणकवली
जिल्हा बँकेचे मतदान 4 वाजता पूर्ण होताच महाविकास आघाडीच्या बूथ वरून घोषणाबाजी करण्यात आली. लागलीच भाजपच्या बूथ वरूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
जिल्हा बँकेसाठी चे निवडणूक सकाळपासून किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत पार पडली चार वाजता मतदान पूर्ण होताच शिवसेना बुथवरून फटाके लावत घोषणाबाजी करण्यात आली.
लागलीच समोरून जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर देण्यात आले दोन्ही बूथ काही फुटांच्या अंतरावर असल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लागलीच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटेकर यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच दंगा काबू पथकाचे जवान घटनास्थळी करण्यात आले होते. दोन्ही बाजूनी करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.