वार्ताहर/ सांबरा
कणबर्गी येथे श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळ आयोजित भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी महापौर शिवाजी सुंठकर होते.
प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन रामा दसका यांनी केले. प्रास्ताविक गजानन सांबरेकर यांनी केले. स्पर्धेमध्ये चाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक- अवचितगड, साहिल गुगरट्टी व सहकारी, बसवेश्वर गल्ली, द्वितीय- सिंहगड, सर्वेश सुतार व सहकारी, रामतीर्थ गल्ली, तिसरा- जंजिरा, आकाश चिकोर्डे व सहकारी, चव्हाट गल्ली, तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पन्हाळागड, सिद्धेश्वरनगर, पन्हाळागड, ज्योतिर्लिंग गल्ली, सज्जनगड, शांतीसागर गल्ली, हाथगड, शिवसेना युवक मंडळ, पन्हाळागड, पाटील गल्ली, हाथगड, भंडीमार्ग, मल्हारगड, ज्योतिर्लिंग गल्ली, पन्हाळागड, शिवाजी गल्ली व हाथगड, ज्योतिर्लिंग गल्ली यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सर्व विजेत्या स्पर्धकांना शिवमूर्ती व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गजानन गुगरट्टी, दीपक गुगरट्टी, कल्लाप्पा बेळगुंदकर, केदारी गोवेकर, प्रमोद गुगरट्टी, भरमा गोवेकर, समीर निर्मळकर, परशराम बेळगावकर, गुरुनाथ दड्डीकर, चंद्रकांत कंग्राळकर, सिद्राय सुळगे-पाटील, सुनिल गोवेकर, बंडू देसाई, मुकुंद घाडी, मधु पाटील, अनिल गोवेकर, सतीश बिर्जे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी देणगी रूपात शिवमूर्ती शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, माजी नगरसेवक दिलीप बैलूरकर, कंग्राळी खुर्दचे माजी ग्रा. पं. सदस्य अनिल सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
सूत्रसंचालन परशराम मालाई यांनी केले. किसन सुंठकर यांनी आभार मानले.