ऍड. एन. आर. लातूर यांची आमदारांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथे स्मार्ट सिटीअंतर्गत उत्तम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे याच परिसरात एखादे पक्षीधाम सुरू करावे, यामुळे बेळगाव परिसरातील पर्यटकांना या ठिकाणी पक्षी पाहण्याचा आनंद घेता येईल. स्थानिकांनाही रोजगार मिळेल. त्यामुळे येथे लवकर पक्षीधाम सुरू करावे, अशी मागणी बेळगाव बांधकाम संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांनी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रविवारी आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन त्यांना पक्षीधामच्या निर्मितीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी चित्रपट अभिनेता संतोष, डॉ. बसवराज आदी, किरण नागलोटी, लक्केश हेग्गण्णावर, ऍड. बसवराज कोटीवाले, शरद गोदी यांच्यासह इतर उपस्थित होते.