गोकुळ शिरगाव / वार्ताहर
सध्या कोरोना व्हायरस च्या प्रसाराने सगळीकडेच लॉकडाउन व बंद पुकारला जात आहे .यामध्ये शाळाही सापडल्या आहेत, या लॉकडाऊन चा फायदा घेत कणेरीवाडी (तालुका) करवीर येथील विद्या मंदिर कणेरीवाडी ही शाळा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा करून सुशोभिकरण करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व शाळा व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेऊन संपूर्ण मराठी शाळेचे रूप पालटणार असून याठिकाणी लोकवर्गणीतून जवळपास पंचवीस लाख रुपये जमा करून या शाळेचे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, यामध्ये शाळेत असणारे फळे, बेंच, ई लर्निंग सुविधा शाळेसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी उपयोगी पडेल असा हॉल. शाळेच्या सुरुवातीच्या मुख्य भिंतीवर लोकराजा राजश्री शाहू महाराज यांचे चित्र त्यांनी बांधलेले धरण .अभयारण्य अशा पद्धतीची सुरुवात शाळेत करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय शाळेच्या सर्व भिंतीवर आजच्या डिजिटल विभागात चमकणारे आपले राष्ट्रीय खेळ यामध्ये कबड्डी. कुस्ती. खो-खो शिवाय आर्मी. नेव्ही या प्रकाराची भिंतीवर चित्र काढून ही शाळा वेगळे रूप घेतानाचे याठिकाणी आज पाहायला मिळत आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत असल्याकारणाने या गावातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे .त्याप्रमाणे शाळेतील पट ही पहिली ते सातवीपर्यंत जवळपास 700 विद्यार्थ्यांचा पट याठिकाणी आहे. ही शाळा या परिसरातच नव्हे तर राज्याने आदर्श घ्यावा अशा पद्धतीची शाळा आपण करणार असून ही शाळा बघून कोणत्याही पालकांची अथवा विद्यार्थ्यांची मानसिकताही इंग्लिश मीडियम स्कूल कडे न वळता मराठी माध्यम कडे वाढण्याचे ध्येय ठेवूनच आपण हे काम करत असल्याचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सांगितले .
गोकुळ दूध संघाचे चेअरमन व सर्व संचालक यांनीसुद्धा या शाळेला भेट दिली असून या शाळेसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन गोकुळ दूध संघाकडून यांना मिळाले आहे .शाळा व्यवस्थापन समिती . ग्रामपंचायत सरपंच .उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य हे परिश्रम घेत असून यामध्ये प्रकाश खोत व रामचंद्र कदम यासाठी मोलाचे परिश्रम घेत आहेत.