प्रतिनिधी / बेळगाव
कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे एकयाना फौंडेशनच्या अंजनी पाटील यांच्या सहकार्याने शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोनामुळे यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री उपस्थित होत्या. प्रारंभी रितेश पाटील यांनी आरती म्हटली. सोहम शिंत्रे, सुमित राघोजी, मंथन यळ्ळूरकर, आनंद नलवडे व पवन नलवडे यांनी लाठी प्रात्यक्षिक दाखविले. शिवनिश्चय तालीम यांनी ढोलताशा तसेच मर्दानी खेळ सूरज बिरजे यांनी सादर केले. या कार्यक्रमाला एसीपी सदाशिव कट्टीमनी, शहापूरचे सीपीआय राघवेंद्र हवालदार, पीएसआय मंजुनाथ नाईक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी संदीप सनाईक, केदार पाटील, अंबरीश देसाई, विजय बेळगावकर, निकिता ढेगसकर, पवनकुमार यांचे सहकार्य लाभले.