प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर कॉलनी येथे दोघा मटकाबुकींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून या दोघा जणांवर मार्केट पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अमित प्रमोद धामणेकर, प्रमोद मनोहर धामणेकर (दोघेही रा. कपिलेश्वर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या जवळून एक पेन, मटक्मयाच्या चिठ्ठय़ा व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
शहर व उपनगरांत मटका, जुगारी अड्डय़ांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गैरधंद्यांविरुद्ध कारवाईची आघाडी उघडली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून वेगवेगळय़ा पोलीस स्थानकातही कारवाई केली जात आहे.