ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाने बॉलीवूडमध्ये देखील शिरकाव करत अनेक कलाकारांना आपला शिकार बनवले आहे. त्यातच आता कबीर सिंग या चित्रपटातील अभिनेत्री निकिता दत्तला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः याबाबत माहिती दिली.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर निकिता होम क्वारंटाइन झाली आहे. निकिता दत्तने कबीर सिंह या पिक्चरमध्ये जिया शर्माची भूमिका साकारली होती. निकिता शिवाय निकिताची आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. सध्या तिची आई दिल्लीमध्ये आहे. दरम्यान, निकिता ‘ द बिग बूल’ या चित्रपटात अभिषेक बच्चनबरोबर दिसणार आहे. हा पिक्चर 8 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
यापूर्वी अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. विकी कौशल, भूमी पेडणेकर, अक्षय कुमार, गोविंदा, आमिर खान, आर. माधवन, बप्पी लहरी, एजाज खान आदी कलाकारांना कोरोनाची बाधा झाली आहे.